देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांची नावे मूळ हक्कात घेण्यासह वारस नोंदी तातडीने करण्याची मागणी


देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन, शेतकऱ्यांची नावे मूळ हक्कात घेण्यासह वारस नोंदी तातडीने करण्याची मागणी.

कराड, दि ११  : रवी वाकडे 

 देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांची नावे मूळ हक्कात घेण्यासह वारस नोंदी तातडीने करण्याची मागणी देवस्थान  इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा, सातारा जिल्हा समितीच्या वतीने कराड येथे मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले. देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे इतर हक्कात असल्यास ती मूळ हक्कात घेण्यात यावीत, तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या वारसाहक्काच्या नोंदी तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



देवस्थान जमीन कसणारे कुळ आण्णा बाबू तडाखे, वसंत बाबू तडाखे, दिनकर बाबू तडाखे, व बजरंग तडाखे, यांच्या जमिनी पुन्हा देवस्थानला देण्याबाबत झालेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.गोंदी गावातील देवस्थान शेतकी खंड भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा खंड भरून घेण्यात यावा, तसेच देवस्थान खात्यातील जमीन खालसा करून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन कॉ. माणिक अवधडे, कॉ. उमेश देशमुख, जालिंदर यादव गुरुजी, प्रकाश यादव, अशोक यादव, नितीन पाटील, कुमार चिंचकर, आनंद मुळगावकर, संग्राम पवार, माणिक पाटील, राजू पवार, राजेंद्र माने, अरुण देशमुख व नुरुल मुल्ला यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले.

देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क, वारस नोंदी व जमिनीच्या मालकीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा, सातारा जिल्हा समितीने केली आहे.

Comments