हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये संस्कृत भाषा दिन अनोख्या पद्धतीने साजरा. एकदिवसीय श्रावणी सहलीचे साधले औचित्य.


   


           एकदिवसीय श्रावणी सहलीचे साधले औचित्य साधून .    हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये संस्कृत भाषा दिन अनोख्या पद्धतीने साजरा. 

            

सातारा, दि.7 - प्रा. अजय शेटे.

        हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये संस्कृत भाषा दिन अनोख्या पद्धतीने साजरा. एकदिवसीय श्रावणी सहलीचे साधले औचित्य.  वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय मध्ये शनिवार ,दि.29  ऑगस्ट रोजी संस्कृत भाषा दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका  सौ. बी.एस.माने मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ.एस.पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक ए.एम.राऊत, व्हि. टी.पवार,ज्येष्ठ शिक्षक एस.एस.जामदार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी संस्कृत भाषा दिनाच्या अनुषंगाने सर्व शालेय विद्यार्थ्यांची  एकदिवसीय पायी श्रावणी सहल स . ठिक 7.30 वा.श्री शनी मंदिर, वडूज येथे क्षेत्र भेट देण्यासाठी नेण्यात आली. संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी  पायी चालताना संस्कृत भाषा,भारत देश व शाळा प्रेम विषयक घोषणा संस्कृत भाषेत दिल्या.


                    

यातून संस्कृत भाषा हि विश्व भाषा होण्याच्या पात्रतेची असून, ती अमूल्य प्राचीन ज्ञानाचा एक रत्नाकर सागर आहे. ती प्राचीन भारतासह आधुनिक भारताचा आत्मा असून,तिचा जयजयकार सदासर्वकाळ होत राहील. अशा या संस्कृत भाषेचा गौरव होण्यासाठी तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे.अशा या महान संस्कृत भाषेचा आणि तिला जन्म देणाऱ्या भारत भूमीचा जयजयकार असो. ज्ञान विद्या हि विनया ने प्राप्त होते. विनय प्राप्त  व्यक्तीचं  ज्ञान प्राप्तीस योग्य ठरते.प्राप्त झालेले हे ज्ञान धनाच्या योग्यतेचे असून,त्यामुळे धर्माला पण सुख वैभव संप्पनता प्राप्त होते.अशा आशयाच्या या घोषणा  ई.8,9 व 10 वी च्या विद्यार्थी -विद्यार्थिनी  यांनी मोठ्या आनंददायी प्रेरणेने दिल्या.


                        

या नंतर श्री शनी मंदिर येथे दर्शन घेवून, त्याच्या पुढील मैदानात संस्कृत विषय शिक्षिका सौ.आर.आर. गाडवे मॅडम यांनी महाकवी कालिदास व संस्कृत भाषा यांचे महत्त्व सर्वांना सांगितले.यावेळी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संस्कृत भाषेमधील श्री गणेश स्तोत्र,श्री विष्णू स्तोत्र,सुभाषिते, वैयक्तिक व समूह गीत व संख्या गीते सादर करण्यात येवून अनेक वस्तूंची संस्कृत नावे,दैनंदिन काल मापन घड्याळ दर्शन अशा  शैक्षणीक साहित्य  प्रदर्शनाच्या माध्यमातून  संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.




या नंतर अनेक शारीरिक व  बौद्धिक खेळ खेळण्यात येवून सर्वांनी डबा भोजनाचा आनंद घेतला व स.11.30 वा.सहल पुन्हा शाळा प्रांगणात माघारी आली. हि एक दिवसीय श्रावणी सहल व संस्कृत भाषा दिन यशस्वी करण्यासाठी शाळा संकुलातील सौ. एन.पी.पंडीत मॅडम,सर्व शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी विशेष प्रयत्न केले.या अनोख्या उपक्रमाची सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा करण्यात आली.




Comments