उंब्रजमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी पाच जणांना चावा .

 


उंब्रजमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी पाच जणांना चावा.


उंब्रज दि २९  : रवी वाकडे 

      उंब्रजमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी पाच जणांना चावा  उंब्रज परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी एका दिवसात तब्बल पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे.

गावातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरत असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांच्या मागे कुत्रे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांचा त्रास अधिक जाणवत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकाच दिवशी पाच जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.



प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments