तळबीड पोलिसांची दमदार कामगिरी, संशयाच्या सुईवरून चोरीचे लोखंडी साहित्य जप्त.



   तळबीड पोलिसांची दमदार कामगिरी, संशयाच्या सुईवरून चोरीचे लोखंडी साहित्य जप्त.

   

उंब्रज दि ०३ : रवींद्र वाकडे

तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील तासवडे एमआयडीसी परिसरात संशयास्पदरीत्या बाळगण्यात आलेल्या लोखंडी साहित्यावर तळबीड पोलिसांनी कारवाई करून ₹७८१५/- किमतीचे लोखंडी साहित्य जप्त केले आहे.याबाबत पोलीस हवालदार योगेश भिकू भोसले (ब. नं. १९८३), तळबीड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.

मीळालेल्या माहितीनुसार, आयशान स्क्रॅप सेंटर, तासवडे एमआयडीसी येथे संशयास्पद लोखंडी साहित्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तपासणीदरम्यान दुकानात विविध आकाराचे लोखंडी बार व प्लेट्स मिळून एकूण ₹७८१५/- किमतीचे साहित्य आढळून आले.यावेळी स्क्रॅप सेंटरचे मालक अन्वर बालेखान मुजावर (वय ४८ वर्षे, रा. शिरवडे , ता. कराड, जि. सातारा) यांच्याकडे सदर साहित्याच्या मालकीबाबत व खरेदी-विक्रीसंदर्भातील वैध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे सादर केली नाहीत.

त्यामुळे सदर लोखंडी साहित्य चोरीचे किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळविल्याचा संशय आल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १२४ अन्वये कारवाई करून अन्वर बालेखान मुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ₹७८१५/- किमतीचे लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदरची कारवाई प्रभारी अधिकारी API रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश भोसले, पोलीस अंमलदार गणेश बाकले यांनी केली असून पुढील तपास  हवालदार धीरज चतुर करीत आहेत.

Comments