आर्वीच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; जि. प. शाळेचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन.


आर्वीच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा;  जि. प. शाळेचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन.

      

सातारा दि २३ :- रवी वाकडे 

 आर्वीच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा;  जि. प. शाळेचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन.आर्वीच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. मौजे आर्वी येथे नूतनीकृत जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या शुभहस्ते आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुसज्ज, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. या नूतन इमारतीमुळे आर्वी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळणार असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची मजबूत पायाभरणी होणार आहे.”

“गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती नव्हे, तर पुढच्या पिढीचे भविष्य घडवणारे शिक्षण!” या विचारातून विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. प्रियाताई शिंदे, गटविकास अधिकारी सौ. सुप्रिया चव्हाण, भाजपा मंडल अध्यक्षा श्वेता गायकवाड, माजी जि.प. सदस्य समृद्धीबाबा जाधव, युवा नेते तात्यासाहेब साबळे, चेअरमन पवन जाधव, व्हा. चेअरमन मीराबाई जगदाळे, माजी पं. समिती सदस्य अण्णासाहेब निकम, सुनील मलवाडकर, भाजपा मंडल अध्यक्ष व रहिमतपूर नगरसेवक रणजित माने, खटाव-माण साखर कारखान्याचे संचालक कृष्णातमामा शेडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह PWD विभागाचे चव्हाण साहेब, मुख्याध्यापक माने सर, सरपंच विघ्नेश पवार, माजी उपसरपंच कल्पना पवार व सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .उद्घाटनानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments