महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या समोर उड्डाण पूल, ग्रेड सेप्रेटर व भुयारी मार्ग व सेवा रस्ते बांधले जावेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आग्रही मागणी.


महाराष्ट्रातील सर्व  शाळांच्या समोर उड्डाण पूल, ग्रेड सेप्रेटर व भुयारी मार्ग व सेवा रस्ते बांधले जावेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आग्रही मागणी.
सातारा,दि.26-प्रा.अजय शेटे.
 महाराष्ट्र राज्यात अनेक नावाजलेल्या मोठ्या शाळा व कॉलेज असून,यातील काही शाळा या रहदारीच्या राष्ट्रीय,राज्य व जिल्हा मार्गावर फार पूर्वीपासून चालू असून,अनेक वर्षे या शाळा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून,विद्यार्थ्याना घडवत आल्या आहेत.या शाळा मधून,अनेक नावाजलेले विद्यार्थी तयार होऊन त्यांनी आपले ज्ञान या देशासाठी व परदेशात पण उपयोगी आणले आहे. अशा शाळेत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी - विद्यार्थिनी पूर्व प्राथमिक ,प्राथमिक,माध्यमिक ,उच्च माध्यमिक व उच्च शिक्षण घेत असून,त्यांच्या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर सदर शाळांच्या प्रवेश द्वारावर दुचाकी,चारचाकी,अवजड वाहने तसेच स्त्री - पुरुष पालक वर्ग व विद्यार्थी - विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक यांची गर्दी होत असते.त्यामुळे सर्वांना आपला जीव मुठीत धरून,रस्ता पार करावा लागतो अथवा गाडीत बसणे - उतरणे करावे लागते.या मध्ये काही आजारी व अपंग व दिव्यांग विद्यार्थी व पालक यांचाही समावेश असतो.शिवाय याच वेळेत अनेक शाळा व शासकीय व निमशासकीय कार्यालये सुरू व बंद होण्याच्या स्थितीत असतात.त्यामुळे या वेळीच  मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढत असते.
या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक वेळा लहान - मोठे अपघात घडत असतात.यातून काही वेळा विद्यार्थी व पालक यांना दुखापत होण्याचे कदाचित प्रसंगी अपंगत्व येवून, अकाल मृत्यू येण्याच्या घटना सुद्धा घडत असतात.त्यासाठी आपल्या अधिकारात लवकरात लवकर अशा शाळे समोरील वर्दळीच्या ठिकाणी लहान - मोठे उड्डाणपूल,ग्रेड सेप्रेटर ,भुयारी मार्ग व सेवा रस्ते  तेथील स्थान निश्चित स्थानिक गरजे प्रमाणे त्वरित निर्माण केले जावेत .अशा आशयाचे एक हजारच्या वर स्त्री - पुरुष पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी,शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडे राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण संगटने तर्फे करण्यात आले आहे.तसेच सदर बाबतीत रोज स.शाळा भरते वेळी 10.15 ते 11.15 व  संध्या.4.45 ते  5.30 या वेळेत व शनिवारी स.7 ते 7.30 व स.11.30 ते 12 या वेळेत मोठी अवजड वाहने यांना प्रवेश बंदी करता आल्यास ,मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी व लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण पण कमी होऊन, सुरक्षितता प्राप्त होईल. तसेच सदर शाळा भागात वाहनांची कमी  वेग मर्यादा निश्चित केली जावी ,तसेच  शाळे समोरील रस्त्यावर  दोन्ही बाजूस  'नो पार्किंग झोन ' नियमावली तयार करून अंमलात आणली जावी तसेच  समोरील रत्यावर दोन्हीं बाजूस जास्त प्रमाणावर  गती रोधक व उंच रंबलिंग पट्टे तयार केले जावेत. शाळा सूचक मोठे फलक उभे केले जावेत , धोका दर्शवणारी  लाल  चालू - बंद राहणारी सिग्नल दिवा यंत्रणा उभी केली जावी तसेच शाळेच्या  भिंती बाहेर  सुरक्षा वाक्ये मोठ्या ठळक अक्षरात लिहिली जावीत व इतर खाजगी डिजिटल माहिती बोर्ड  लावण्यास प्रतिबंध केला जावा.तरी सदर समस्या बाबत आपण योग्य ते लक्ष घालून,सुधारणा करावी.अशा आशयाचे हे निवेदन एक हजार चे वर विद्यार्थी- विद्यार्थिनी,स्त्री - पुरुष पालक वर्ग ,शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने नुकतेच रवाना करण्यात आले आहे.

Comments