हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये एड्स आजार नियंत्रण विषयक व्याख्यान संप्पन्न.



हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये एड्स आजार नियंत्रण विषयक व्याख्यान संप्पन्न.

सातारा, दि.25-प्रा.अजय शेटे.

   हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये एड्स आजार नियंत्रण विषयक व्याख्यान संप्पन्न.  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या इंटेन्सिफाईड आय.ई.सी. कार्यक्रमाअंतर्गत आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सिव्हिल हॉस्पिटल सातारा चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. हेमंत भोसले सर आणि ग्रामीण रुग्णालय वडूज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी संवेदीकरण कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयात राबविले जातात, गाव पातळीवर ग्राम संवेदीकरण कार्यक्रम ग्रामसभेत राबविले जातात.  

याच अनुषंगाने आज दि. 24/08/2026 रोजी हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्यूनियर कॉलेज वडूज येथे इंटेसी फाईड आय ई सी कँपैन स्कूल अवेअरनेस सेशन अंतर्गत शालेय विद्यार्थी संवेदीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आय सी टी सी समुपदेशक श्री.कल्याण बंडगर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

                   

त्यामध्ये संतुलित आहार त्याचे महत्त्व, किशोर वयात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच  एच आय व्ही एड्स प्रतिबंध, कलंक, भेदभाव, क्षयरोग, कावीळ गुप्तरोग, शारीरिक स्वच्छता, एड्स आजाराची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय व एच आय व्ही तपासणी करून घेण्याचे महत्त्व इत्यादी माहिती सांगितली. तसेच टोल फ्री क्रमांक 1097, सेल्फ रिस्क असेसमेंट स्कॅनर बाबत माहिती देऊन तो स्कॅन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास एकूण 170 विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख  प्रा.आर.बी.येलमर, प्रा.एस. जी.तिवाटणे, प्रा . पी.एस.कुलकर्णी , प्रा.सौ.व्ही.एस.काळे, प्रा.सौ.एम.एस. काळे, प्रा.सौ.जे .एस.पाटील, प्रा.सौ.आर.एम.डोंबे, प्रा. एन.एस.मगर, प्रा.ए.व्ही.शेटे, प्रा.सौ.जे.एस.कुलकर्णी, प्रा.सौ.व्ही.व्ही.कोकाटे, प्रा .एस. व्ही.भिसे, प्रा.सौ.सी.जे.इंदौरकर , प्रा.सौ.एन.आर.जाधव, प्रा.पी.पी.काळे ई.शिक्षक उपस्थित होते.

Comments