आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा - अभिनेते , दिग्दर्शक अदित भंडारे .
सातारा - दि.17 -प्रा अजय शेटे
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा - अभिनेते , दिग्दर्शक अदित भंडारे . महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील , पुणे शहर अध्यक्ष मा. धीरज घाटे , आमदार मा. हेमंत रासने , भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मा. योगेश सुपेकर तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि सुंदर वातावरणात पार पडला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी, पुणे शहर – हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर दाखविलेला हा विश्वास आणि दिलेली जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे.असे प्रतिपादन पुण्याचे ख्यातनाम अभिनेते ,दिग्दर्शक अदित भंडारे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, या पदाच्या माध्यमातून पुणे शहरातील कलाकार, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि कला प्रेमींना एकत्रित आणत ,संस्कृती व कलेच्या माध्यमातून समाजाशी जोडण्याचे कार्य अधिक जोमाने करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
या बद्दल पक्षश्रेष्ठी, सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.यापुढेही
मी भारतीय जनता पार्टीच्या विचार धारे सोबत सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.




Comments
Post a Comment