हुतात्मा परशुराम विद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश.


हुतात्मा परशुराम विद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश.

                 

सातारा, दि.17  -प्रा.अजय शेटे.

 वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित,हुतात्मा परशुराम विद्यालय व म. जोतिबा फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी ई.4 थी,7 वी व आठवी वर्गाच्या स्कॉलरशिप परीक्षे मध्ये जिल्हा पातळीवर भरघोस यश मिळवले. ई.4 थी मध्ये गुणवत्ता यादी मध्ये चि.अथर्व विजय खाडे याने  258 गुणांसह 58 वा, चि.सम्राट सचिन पवार,252 गुण,60 वा, चि.वेदांत विक्रम चव्हाण,248 गुण,76 वा,तर 7 वी स्कॉलरशिप परीक्षे मध्ये चि.ओजस अजय शेटे याने 256 गुणांसह 56 वा, कु.अक्षरा सुरेश खुस्पे,248 गुण,142 वी, व ई.8 वी परीक्षेत कु. स्वरांजली प्रताप निंबाळकर ,270 गुण,44 वी, कु.स्वागतिका सर्जेराव मोहिते,268 गुण ,50 वी व चि. अथर्व मोहन डोंबे याने ,250 गुण,82 वा क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश मिळवले.वरील सर्व परीक्षार्थीना मुख्याध्यापिका सौ.बी.एस.माने ,मुख्याध्यापिका सौ.शितल शिंदे ,शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका सौ. एम. ए.शेटे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


                             

या सर्व यशस्वी विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचे संस्थेचे चेअरमन गोविंद भंडारे, व्हॉईस चेअरमन विजय म्हामणे,सचिव सचिन काळे,शाळा समिती अध्यक्ष संतोष कांबळे, संचालक सुभाष येवले,सतीश शेटे, डॉ.हेमंत पेठे,अशोक भंडारे,गजानन शेटे,प्रशांत शेटे,ज्ञानेश्वर पंडीत,नितीन जाधव,संजय येवले,शैलेश देशपांडे,रवींद्र काळे, डॉ.सचिन पवार यांच्यासह सर्व पालक वर्ग,उप मुख्याध्यापिका सौ.एस.पी.जोशी,पर्यवेक्षक ए.एम.राऊत, व्ही. टी.पवार,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.रवींद्र येलमर,सर्व शिक्षक - शिक्षिका यांनी विशेष अभिनंदन केले.

Comments