तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना लोकमत एक्सलन्स अवॉर्ड जाहीर.
कराड दि २९ :- रवी वाकडे
तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना लोकमत एक्सलन्स अवॉर्ड जाहीर. सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी लोकमत मीडिया प्रा. लि. यांच्या वतीने दरवर्षी 'लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स' सोहळ्याचे आयोजन केले जाते.
यंदाच्या 'लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स - सातारा' या गौरवशाली सोहळ्यासाठी तळबीड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र भोरे यांची निवड झाली आहे.
पोलीस सेवेतील त्यांचे उल्लेखनीय कार्य, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली प्रभावी कारवाई, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि सर्वसामान्य जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून समाजाच्या प्रगतीत दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोकमतच्या या पुरस्कारामुळे पोलीस दलाची मान उंचावली असून, श्री. भोरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल तळबीड पोलीस स्टेशनसह सातारा जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.


Comments
Post a Comment