गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर तारळे पोलिसांकडून मंडळांना सूचना; शांतता राखण्याचे आवाहन.


गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर तारळे पोलिसांकडून मंडळांना सूचना; शांतता राखण्याचे आवाहन.
तारळे दि :- राणी जाधव, प्रतिनिधी

यंदा श्री गणेशाचे आगमन सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर तारळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक आज पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

यावेळी मंडळांना आगमन मिरवणूक शांततेत व नियमानुसार काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीसाठी पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, रात्री १० नंतर डीजे व लाऊडस्पीकर वापरावर बंदी राहील, असे स्पष्ट करण्यात आले.

वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, आक्षेपार्ह गाणी व देखावे टाळावेत, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, तसेच मंडपात सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र बसवावे आणि स्वयंसेवकांची यादी पोलीस ठाण्यात जमा करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन तारळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी केले.

Comments