उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये चिमुकल्यांनी बांधली राखी;

 

            

          

उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये चिमुकल्यांनी बांधली राखी. 




          उंब्रज दि २५ :- रवी वाकडे        

         उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये चिमुकल्यांनी बांधली राखी;  रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून आज उंब्रज पोलीस स्टेशन येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

मौजे उंब्रज येथील बचपन स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधली. "आमचे रक्षण करणाऱ्या पोलिस दादांना राखी" म्हणत विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.

             

यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले, तर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनीही विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून आनंद साजरा केला. पोलीस आणि नागरिकांमधील नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरला.



यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

Comments