भाजपा सांस्कृतिक आघाडीची पुणे शहरात स्थापना कलाकारांचे संघटन, समस्या निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार . योगेश सुपेकर ,

 

         


  भाजपा सांस्कृतिक आघाडीची पुणे शहरात  स्थापना  कलाकारांचे संघटन, समस्या निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार . योगेश सुपेकर ,पुणे शहर सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष .

     

पुणे  दि  :- अदित भंडारे 

 कलाकारांच्या विविध समस्या सोडविणे, कलाकारांचे संघटन मजबूत करणे तसेच शासकीय योजनांचा लाभ कलाकारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीची पुणे शहरात नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून पुणे शहरातील कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष श्री. योगेश सुपेकर यांनी दिली.

पुणे शहर तसेच विविध मतदारसंघांच्या कार्यकारिणीचा पदनियुक्ती समारंभ भाजपा शहर कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सुमारे दोनशे कार्यकर्ते व कलाकारांची उपस्थिती होती.

             

यावेळी कलाकारांना मार्गदर्शन करताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “कलाकार हा केवळ अभिनय किंवा कला क्षेत्रापुरता मर्यादित नसतो, तर समाजापर्यंत विविध संदेश पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे कलाकारांनी समाजप्रबोधनाच्या कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा.” समाजात सकारात्मक विचार आणि सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी कलाकारांनी आग्रही भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे यांनी कलाकारांच्या पाठीशी भाजपा कायम ठामपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. कलाकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी तसेच नवनियुक्त सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कलाकारांचे संघटन, त्यांच्या प्रश्नांना न्याय आणि समाजप्रबोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून पुणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









Comments