ईद-ए-मिलाद व आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शिरवडे गावात तळबीड पोलीस स्टेशनच्या वतीने मार्च चे आयोजन .

 


ईद-ए-मिलाद व आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शिरवडे गावात  तळबीड पोलीस  स्टेशनच्या वतीने  मार्च चे आयोजन .

        

 शिरवडे, दि. २५  :-

 ईद-ए-मिलाद तसेच आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शिरवडे गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि दोन्ही सण शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, या उद्देशाने शिरवडे गावामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने रूटमार्च घेण्यात आला.सदर रूटमार्चमध्ये पोलीस अधिकारी,  अंमलदार तसेच RCP  जवान पथक गृहरक्षक दलातील जवान सहभागी झाले होते. 

ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्य कायम राहावे तसेच सर्व नागरिकांनी परस्परांच्या धार्मिक भावना व परंपरांचा आदर करून सण साजरे करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.तसेच सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह मजकूर, धार्मिक भावना दुखावणारे संदेश अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करू नयेत. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.




गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिक्षेपकाचा वापर, गर्दीचे नियोजन व सुरक्षा व्यवस्था याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

“शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा कायम ठेवत ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा,” असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments