हुतात्मा परशुराम विद्यालय मध्ये नशा मुक्त अभियान कार्यक्रम संप्पन्न.नशा व्यसनी माणसाच्या दुर्दशेचे महत्वाचे कारण - पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे .
हुतात्मा परशुराम विद्यालय मध्ये नशा मुक्त अभियान कार्यक्रम संप्पन्न.
नशा व्यसनी माणसाच्या दुर्दशेचे महत्वाचे कारण - पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांचे प्रतिपादन.
सातारा, दि.7 - प्रा.अजय शेटे.
केंद्र शासन नशामुक्त युवा अभियान अंतर्गत वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय मध्ये दि.4 रोजी स.10.30 ते 11.30 या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी वडूज पोलीस स्टेशन चे निरीक्षक मा.घनशाम सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शन झाले.ते म्हणाले की,नशा हि व्यसनी माणसाच्या दुर्दशेचे मोठे कारण असून,नशेचे दुष्परिणाम समजून घेतल्यास एक हि विद्यार्थी तिच्या आहारी जाणार नाही.कुटुंबात एक व्यक्ती व्यसनी असेल तर त्याचे परिणाम सर्व कुटुंबाला सोसावे लागतात.त्यामुळे घरातील सर्वांनी अगदी मिस्री पासून पुढील सर्व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
या वेळी निर्भया पथक प्रमुख कॉन्स्टेबल मेजर तानाजी चंदनशिवे यांनी सांगितले की,आम्ही निर्भया पथकामार्फत सर्व शाळा परिसर व विद्यार्थी यांच्यावर काटेकोर लक्ष ठेवतो व काही चुकीचे चालले असल्यास त्यावर नियंत्रण आणून वातावरण चांगले ठेवतो. यावेळी त्यांच्या समवेत महिला कॉन्स्टेबल राजश्री खाडे, मल्हारी हांगे व सागर पोळ व जाधव हवालदार यांनी पण कार्यक्रमात सहभाग घेतला.शाळा संचालक प्रशांत शेटे व मुख्याध्यापिका सौ .बी.एस.माने मॅडम यांच्या हस्ते मा.सोनवणे साहेब यांचा यथोचित सत्कार शाल व बुके देवून करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापिका सौ.एस. पी.जोशी मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
यानंतर प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेच्या राणी दीदी यांनी सर्वांना व्यसन विरोधी माहिती सांगून,प्रतिज्ञा शपथ दिली.त्यांच्या समवेत अरूणा दीदी पण उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे विशेष आयोजन पर्यवेक्षक ए.एम.राऊत सर व क्रीडा शिक्षक आर.एस.जगदाळे यांनी करून,कार्यक्रम यशस्वी केला.आभार प्रदर्शन प्रा.अजय शेटे यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी - विद्यार्थिनी ,शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment