रक्षाबंधनला सासपडे येथे पोलीस दीदीने जपले आर्याचे स्वप्न.


रक्षाबंधनला सासपडे येथे पोलीस दीदीने जपले आर्याचे स्वप्न.
तारळे दि 31 :-  राणी जाधव
रक्षाबंधनला सासपडे येथे पोलीस दीदीने जपले आर्याचे स्वप्न.
रक्षाबंधनाचा पवित्र सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना सासपडे येथे एक हृदयस्पर्शी घटना घडली.

१० महिने १९ दिवसांपूर्वी या कुटुंबातील आर्या या चिमुकलीचे दुःखद निधन झाले. तिचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिच्या जाण्यावर आजही कुटुंबाचा विश्वास बसत नाही.

मात्र आज रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या कुटुंबाला एक वेगळाच अनुभव आला. पोलीस दलातील *चिन्मई वाघमारे पोलीस दीदी* यांनी सासपडे येथील घरी येऊन आर्याचा भाऊ सार्थक याला राखी बांधली.

"आर्या बाळा तुझे स्वप्न होते, आज तू जाऊन १० महिने १९ दिवस झाले पण आज खऱ्या अर्थाने तुझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. दीदीच्या रूपात मी आर्यालाच पाहतेय," अशा भावुक शब्दांत आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि रक्षाबंधनाच्या खऱ्या नात्याचे दर्शन घडले.

Comments