स्वातंत्र्यदिन झाला गोड, हाती शैक्षणिक आधार ,महाराज ग्रुपने दिला चिमुकल्यांना आनंदाचा उधान.


स्वातंत्र्यदिन झाला गोड, हाती शैक्षणिक आधार.....!महाराज ग्रुपने दिला चिमुकल्यांना आनंदाचा उधान.....!!
तारळे दि 17 :- राणी जाधव
स्वातंत्र्यदिन झाला गोड, हाती शैक्षणिक आधार.....!
महाराज ग्रुपने दिला चिमुकल्यांना आनंदाचा उधान.....!!
  भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या 'महाराज ग्रुप'च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केरळ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेंढोशी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
                  स्वातंत्र्यदिनाच्या उत्साही वातावरणात दोन्ही शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी म्हावशीचे बुथ अध्यक्ष गणेश घाडगे, तसेच गणेश लोहार, बळीराम लोहार, मंगेश सुतार, भाऊसो लोहार, प्रवीण चव्हाण आणि अक्षय पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
                        या प्रसंगी महाराज ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष किशोर महाराज,  संदीप लोहार, विकास कदम, प्रणव लोहार, शुभम जाधव, गुरुनाथ लोहार, विश्वजीत पवार, दीपक मराठे, प्रवीण भिसे, नवनाथ भिसे, रविराज जाधव, दादासो पवार आणि सोहम जाधव तसेच महाराज ग्रुप चे सर्व सभासद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
              स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी सामाजिक उत्तरदायित्व मानून विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल दोन्ही शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी महाराज ग्रुपच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व आभार मानले.

Comments