रहिमतपूरमध्ये हजारो नागरीकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली ,हजारो नागरिकांचा सहभाग; ३५० फुटांचा भव्य तिरंगा ठरला रॅलीचे प्रमुख आकर्षण.
रहिमतपूरमध्ये हजारो नागरीकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली ,हजारो नागरिकांचा सहभाग; ३५० फुटांचा भव्य तिरंगा ठरला रॅलीचे प्रमुख आकर्षण.
सातारा दि १४ :- रवी वाकडे
रहिमतपूरमध्ये हजारो नागरीकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली ,हजारो नागरिकांचा सहभाग; ३५० फुटांचा भव्य तिरंगा ठरला रॅलीचे प्रमुख आकर्षण.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत रहिमतपूर शहरात शुक्रवारी दि. 14 रोजी देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. शालेय विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तब्बल ३५० फुटांचा भव्य तिरंगा हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. नगरपालिके पासून सुरू झालेल्या या रॅलीने चौंडेश्वरी मंदिरा मार्गे मुख्य चौक गाठला. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे घेऊन, तसेच देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला. रॅलीस आमदार मनोज घोरपडे यांच्यासह रहिमतपूर व परिसरातील लोकप्रतिनिधी, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे , तहसीलदार संगमेश कोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भोसले, रहिमतपूरच्या प्रथम नागरिक वैशाली माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम ताई, राष्ट्रवादीचे नेते सचिन बेलागडे, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनातील अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, माजी सैनिक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही रॅलीत सहभाग घेतलायावेळी आमदार मनोजदादा म्हणाले, 'हर घर तिरंगा, हर मन तिरंगा' या अभियानाला रहिमतपूर मध्ये युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येऊन 'देश प्रथम, राष्ट्र प्रथम' ही भावना दृढ करण्याचा संदेश या तिरंगा यात्रेतून दिला आहे. रहिमतपूर स्वातंत्र्यसैनिकांची भूमी असून, देशाला आणि राज्याला दिशा देणारा आदर्श निर्माण करण्याची परंपरा या भूमीला लाभली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने युवकांसह सर्व नागरिक एकत्र येऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा करीत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिरंगा रॅलीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी रॅलीत सहभागी होत राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला.यावेळी रणजीत माने निलेश माने सतीश भोसले तुषार चव्हाण सनी माने नंदकुमार माने विक्रम माने जयंत भोसले सर नानासो राऊत विक्रम माने विलास तुपे लालासाहेब जगदाळे रणजीत जाधव संतोष पाटील प्रमोद गायकवाड यांच्यासह रहिमतपूर मधील मान्यवर सर्व शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



Comments
Post a Comment