वडूज मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
तहसीलदार मा.बाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण .
सातारा, दि.16 -प्रा.अजय शेटे.
खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालय ,वडूज येथे 79 वा स्वातंत्र्य दिन तहसीलदार बाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन संप्पन्न झाला.
यावेळी.पोलीस दलाच्या वतीने पी.एस.आय. कर्चे साहेब यांनी त्यांना मानवंदना दिली.
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूजच्या विद्यार्थी - विद्यार्थिनी संगीत गीत मंचाने यावेळी देशभक्ती पर गीतांचे गायन केले. सौ.आर.आर. गाडवे मॅडम,संतोष स्वामी,सौ.आर. एम्.डोंबे मॅडम यांनी गीत मंच सादरीकरणासाठी उत्तम नियोजन केले होते.किरण कांबळे सर यांनी सूत्रसंचालन केले.रवींद्र चौधरी ,अक्षय जाधव यांनी वाद्यवृंद साथ दिली. वडूज चे पोलीस निरीक्षक मा.घनशाम सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाने वडूज पोलीस स्टेशन तर्फे संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येवून,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य झाले.यावेळी स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी संघटनेच्या श्री.महादेव गोडसेआप्पा, प्रा.एन.एस.गोडसे,आणीबाणी राज कैदी श्री.विजय शेटे,सतीश शेटे, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी श्रीमती शशिकला देशमुख,विक्रम काळे,विनय ठिगळे,जितेंद्र शहा,श्रीमती उज्वला शहा, प्रमोद राऊत,दगडू हिंगसे,विशाल टाकणे व इतर वीर माता ,वीर पत्नी यांचा प्रशासना तर्फे मा.धनंजय चव्हाण ,मा.संदिप मांडवे, मा.मनोज देशमुख ,पं समिती सदस्य व विविध अधिकारी वर्ग यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी हुतात्मा परशुराम विद्यालय,छ.शिवाजी हायस्कूल,सेवागिरी स्कूल,ट्रिनिटी स्कूल,केंब्रिज स्कूल यांच्या एन.सी.सी.आर .एस. पी.पथक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी संचलन व संगीत कवायत,देशभक्तीपर गाण्यावर सांघिक व वैयक्तिक नृत्य प्रकार सादर करून,देशप्रेम पर वातावरण निर्मिती केली. शाळा स्तरावर प्राचार्य जे.एच.जाधव,सौ.प्रीती ॲलेक्स,सौ.अस्मिता भंडारे,सौ.दिपा गांधी, सौ.नूतन गाडवे ,श्री.अवधूत खडके या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला वडूज मधील सर्व राजकीय,सामाजिक ,शैक्षणिक ,संपादक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व प्रेरणा पूर्व प्राथमिक व म.फुले प्राथमिक शाळा येथे वडूज शिक्षण विकास मंडळ चेअरमन गोविंद भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत संपूर्ण वंदे मातरम् ,जन गण मन,महाराष्ट्र गौरव गीत गायन करण्यात आले.या नंतर संगीत कवायत सादर करण्यात येवून,संपूर्ण शहरातून वाद्य वृंदासह शिस्तबध्द फेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी देशप्रेम पर घोषणा दिल्या. हुतात्मा स्मारक मध्ये सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी शहरात चौका चौकात देशभक्ती पर गाणी लावण्यात आली होती.घरासमोर रंगीत सुशोभित व फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.अनेक घरांवर तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखात फडकत होता. शाळा संकुलात विद्यार्थी भाषणे होऊन,त्यांना खाऊ वाटप करण्यात आले. प्राचार्या बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.यावेळी सर्व संस्था पदाधिकारी,संचालक, पदाधिकारी शिक्षक - शिक्षिका ,पालक हजर होते.


Comments
Post a Comment