लेखी आश्वासनानंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण स्थगित

 लेखी आश्वासनानंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण स्थगित.प्रशासनाच्या वतीने 30 दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच अनधिकृत अतिक्रमणांबाबत नियमानुसार कार्यवाही करून अतिक्रमणे काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल,

             

उंब्रज दि १४  :- रवी वाकडे  

लेखी आश्वासनानंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण स्थगित.प्रशासनाच्या वतीने 30 दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच अनधिकृत अतिक्रमणांबाबत नियमानुसार कार्यवाही करून अतिक्रमणे काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल,

 उंब्रज, ता. कराड, जि. सातारा : उंब्रज ग्रामपंचायतीतील विविध प्रश्न, अनधिकृत अतिक्रमणे, माहितीच्या अधिकारातील प्रलंबित माहिती तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत योग्य चौकशी व कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी रामदास दिलीप काटवटे यांनी दिनांक 10 ऑगस्ट 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, उंब्रज येथे आमरण उपोषण सुरू केले होते.




या उपोषणाची दखल घेत मा. नायब तहसीलदार राठोड साहेब, गटविकास अधिकारी पाटील साहेब व विस्तार अधिकारी स्वामी साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित विषयावर चर्चा केली.

              

यावेळी प्रशासनाच्या वतीने 30 दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच अनधिकृत अतिक्रमणांबाबत नियमानुसार कार्यवाही करून अतिक्रमणे काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत प्रलंबित असलेली माहिती नियमानुसार उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांच्या कामकाजाबाबत स्वतंत्र वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोष आढळल्यास उचित व कडक कारवाई करणे, याबाबतही प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले.

                                      प्रमुख मागण्या

- उंब्रज परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांबाबत नियमानुसार चौकशी व कार्यवाही.

- माहितीच्या अधिकारांतर्गत प्रलंबित माहिती तातडीने उपलब्ध करून देणे.

- ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांच्या कामकाजाची स्वतंत्र वरिष्ठ स्तरावर चौकशी.

- दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई.

- भविष्यात कोणत्याही नागरिकावर भेदभावपूर्ण कारवाई न करता सर्वांना समान न्याय.

- प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची ठरलेल्या कालावधीत अंमलबजावणी.

याशिवाय भविष्यात कोणत्याही नागरिकावर भेदभावपूर्ण किंवा अन्यायकारक पद्धतीने कारवाई केली जाणार नाही आणि सर्व नागरिकांना समान न्याय दिला जाईल, अशी लेखी हमी देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड यांच्या दिनांक 14/08/2026 रोजीच्या लेखी पत्रामध्येही संबंधित विषयावर नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचा आदर करून रामदास काटवटे यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार 30 दिवसांच्या कालावधीत चौकशी व आवश्यक कार्यवाही पूर्ण न झाल्यास किंवा दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास, पुढील कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आपण राखून ठेवत असल्याचे रामदास काटवटे यांनी स्पष्ट केले आहे.

“माझा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून उंब्रजमधील सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा, प्रशासनामध्ये पारदर्शकता राहावी आणि नियम सर्वांसाठी समान असावेत, यासाठी आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे,” असे रामदास दिलीप काटवटे यांनी सांगितले .




Comments