लिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात .
मुंबई दि. ११ ऑगस्ट :- रवी वाकडे
लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे सकारात्मक चर्चा झाली. विशेषतः जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महाविकास मंडळाच्या योजनांचा सरसकट लिंगायत समाजबांधवांना लाभ मिळावा तसेच जाचक अटी दूर करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीवर शासन सकारात्मक असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री सुनित्रा ताई पवार आणि यांच्या समवेतही लिंगायत समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत यापूर्वीही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज सकारात्मक दिशा मिळाली असून, लिंगायत समाजबांधवांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.
“संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आता मागण्यांच्या अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे.”
एक समाज – एक आवाज – न्याय्य मागण्यांसाठी संविधानिक मार्ग!
या पाठपुराव्यात बसव मृत्युंजय महास्वामीजी, आमदार शिवाजी पाटील आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राजेंद्रजी पाटील मंगेश दादा चिवटे, पैलवान नितीन पाटील मा संजय तेलनाडे तसेच लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मा. मुख्यमंत्री महोदयांसह सर्व संबंधित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment