पाटण तालुक्यात शिंदे गटाला खिंडार ,! कळंबे ग्रामस्थांचा देसाई गटाला रामराम करून सत्यजितसिंह पाटणकर गटात प्रवेश.
पाटण तालुक्यात शिंदे गटाला खिंडार ,! कळंबे ग्रामस्थांचा देसाई गटाला रामराम करून सत्यजितसिंह पाटणकर गटात प्रवेश.
तारळे दि 09:- राणी जाधव
पाटण तालुक्यात शिंदे गटाला खिंडार ,! कळंबे ग्रामस्थांचा देसाई गटाला रामराम करून सत्यजितसिंह पाटणकर गटात प्रवेश.
*कळंबे गावातील ग्रामस्थांचा देसाई गटाला रामराम...!*पाटण तालुक्यात तारळे विभागातील कळंबे गावच्या ग्रामस्थांनी स्थानिक सरपंच व अदानी प्रकल्पाच्या मनमानी कारभाराला कंटाळून यातून भविष्यात भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आपल्याला न्याय देऊ शकतो या अपेक्षेने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला रामराम ठोकत *भाजपा राज्य परिषद सदस्य श्री. सत्यजितसिंह पाटणकर* यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पक्ष प्रवेशावेळी बोलताना कळंबे गावच्या ग्रामस्थांनी सांगितले की गावातील सरपंच यांचा एकतर्फी मनमानी कारभार वाढला आहे, याशिवाय मागील दोन वर्षांपासून अदानी कंपनीचा प्रकल्प गावात होत असून यामध्ये स्थानिक पदाधिकारी गावाचे हित न पाहता स्वतःचे हित व विकास करण्यात गुंतले आहेत.
स्थानिक अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुख्याने गावरान जमिनी, महसूल विभागाशी निगडित पुनर्वसन, भूस्खलन आदी प्रश्न महत्त्वाचे असून त्याची सोडवणूक गरजेची आहे. याशिवाय अदानीच्या कोअर कमिटीत विभागातील इतर लोकांचा वाढता हस्तक्षेप तसेच जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर झालेले गैरव्यवहार यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. या सर्व प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका यापुढे भारतीय जनता पक्ष व राज्य शासनाच्या माध्यमातून सत्यजितसिंह पाटणकर हेच करू शकतात असा विश्वास आमच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर आम्ही सामूहिकपणे हा जाहीर प्रवेश केला आहे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचे प्रलंबित प्रश्न निश्चितच मार्गी लावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. केवळ घोषणा, आश्वासने दबावतंत्र व हुकूमशाही या पद्धतीमुळे आजवर होणारा अन्याय विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात पहायला मिळत आहे. या अन्यायातून मुक्तता व प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करू. याच पद्धतीने ज्या लोकांवर अन्याय होत असेल त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अभिजीत जाधव (माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ), शशिकांत पाटील (संचालक, ख.वि. संघ ), हणमंतराव खबाले-पाटील (माजी व्हा. चेअरमन ख. वि. संघ ), संजय घाडगे (माजी सरपंच),सखाराम सपकाळ (अध्यक्ष डोंगर माथा संघटना), इंद्रजीत चव्हाण (माजी चेअरमन राहुडे विकास सेवा सोसायटी), अक्षय घाडगे (उपाध्यक्ष युवामोर्चा,सातारा जिल्हा भाजप) व कळंबे गावचे सोसायटी चेअरमन श्री. चंद्रकांत जाधव, संचालक भरत जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुशील जाधव, भरत जाधव, माजी सरपंच साहेबराव जाधव, प्रकाश जाधव, नारायण जाधव, सत्यवान जाधव ,अरविंद जाधव, माजी सरपंच तुकाराम जाधव, विष्णू जाधव झेंडेकरी, व्हाइस् चेअरमन प्रकाश कांबळे , योगेश जाधव, अजय जाधव, अमर जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment