डी.वाय.एस.पी.मा.रणजित सावंत साहेब यांच्या हस्ते ' एक पेड मां के नाम ' योजनेचा शुभारंभ.हुतात्मा शाळा संकुलाचा पर्यावरण संवर्धन उपक्रम.


डी.वाय.एस.पी.मा.रणजित सावंत साहेब यांच्या हस्ते ' एक पेड मां के नाम ' योजनेचा शुभारंभ.हुतात्मा शाळा संकुलाचा पर्यावरण संवर्धन उपक्रम.
सातारा, दि.,8 - प्रा.अजय शेटे.
केंद्र शासन पुरस्कृत ' एक पेड मां के नाम ' या वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ खटाव - माण तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रणजित सावंत यांच्या हस्ते येथे हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज या शाळा संकुलात प्राथमिक स्वरूपात दहा रोपे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना वाटून करण्यात आला.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम, वडूज पोलीस स्टेशन चे निर्भया पथक प्रमुख कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे,महिला कॉन्स्टेबल राजश्री खाडे,सागर पोळ सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक - शिक्षिका यांच्या हस्ते हि विविध प्रकारच्या रोपांचे वाटप विद्यार्थी वर्गास करण्यात आले.ज्युनिअर कॉलेज तर्फे एकूण 600 झाडे लावण्याचा व ती विविध ठिकाणी संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.त्याचे जिओ टॅगिंग  फोटो लोकेशन काढून ते पोर्टल ला जमा करून, जतन करण्यात येणार असून,झाड सहा फुटांचे हि पर्यंत त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यात येणार आहे. प्राथमिक व हायस्कूल विभागा मार्फत  वेग वेगळी एकूण 1500 विविध प्रकारची झाडांची रोपे वाटप करून,त्यांचेही फोटो  लोकेशन निश्चित करण्यात येवून,निसर्ग व पर्यावरण संवर्धन व रक्षणाच्या कामात भरीव कामगिरी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
हे अभियान 5 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे विश्व पर्यावरण दिवसाचे औचित्य साधत सुरू करण्यात आले होते.या राष्ट्रव्यापी अभियानाचा उद्देश आपल्या आईच्या सन्मानार्थ प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून,पर्यावरण रक्षणाच्या कार्यात भरीव योगदान देणे हा आहे.या अभियानात भाग घेण्यासाठी My भारत पोर्टल च्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला सहभाग घेता येईल.त्याचे फोटो वरील पोर्टल द्वारे स्थापित करता येतील.या अभियानाच्या माध्यमातून सृष्टीला हिरवीगार करून,पाणी व हवा यांचे संवर्धन करणे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.हे झाड लावून,प्रत्येकाने त्याच्या रक्षणची व संवर्धनाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. सदर अभियान विविध व्यक्ती,संघटना ,विद्यार्थी व युवा वर्ग यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत, शेत, बाग अथवा सार्वजनिक ठिकाणी हे वृक्षारोपण करायचे आहे.या  बाबत अधिक माहिती साठी जवळच्या सरकारी रोप वाटी केशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक - शिक्षिका,पालक - विद्यार्थी मिळून मोठा प्रयत्न करणार आहेत.

Comments