हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये ' नशा मुक्त युवा ' अभियान कार्यक्रम संप्पन्न.युवकांनी व्यसनांना ' नाही ' म्हणावे - उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रणजित सावंत .


  

हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये ' नशा मुक्त युवा ' अभियान कार्यक्रम संप्पन्न.युवकांनी व्यसनांना ' नाही ' म्हणावे - उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रणजित सावंत .

सातारा, दि.6 -प्रा.अजय शेटे.

              हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये ' नशा मुक्त युवा ' अभियान कार्यक्रम संप्पन्न.

युवकांनी व्यसनांना ' नाही ' म्हणावे - उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रणजित सावंत यांचे प्रतिपादन.   आज समाजात विविध व्यसनांचा सुळसुळाट झाला असून,विविध उपद्रवी घटक या युवकांना व्यसनांच्या आहारी नेण्याचे काम करत आहेत.तेव्हा युवकांनी पहिल्यांदा व्यसनांना ' नाही ' म्हणण्यास शिकले पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन खटाव - माण तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रणजित सावंत साहेब यांनी ' विकसित भारत 2047 ' येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये  ,बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी स.10 ते 11.30 या वेळेत ' नशा मुक्त युवा अभियान ' अंतर्गत कार्यक्रमात बोलताना केले.

ते पुढे म्हणाले की,पूर्वी अफू सारख्या मादक पदार्थाचा वापर हा कायद्याने मर्यादित स्वरूपात औषध म्हणून केला जात असे. परंतु नंतर लोकांनी त्याचा गैरवापर सुरू केला.त्याही पुढे आज शहरामध्ये कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर ' ड्रग ' सदृश्य अनेक नवीन पदार्थ विविध रुपाद्वारे पोहोच करणाऱ्या उपद्रवी व्यक्तींच्या साखळ्या समाजात कार्यरत असून,ते तरुण मुला - मुलींना लक्ष करून,व्यसनाधीन बनवत आहेत.तेव्हा सर्व युवक - युवतींनी या बाबत नेहमी सतर्क राहून,स्वतःचा बचाव केला पाहिजे.या नंतर त्यांनी सायबर गुन्हेगारी व भावी जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग विद्यार्थांना सांगितले.तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विचारलेल्या समस्या बाबत उत्तम मार्गदर्शन केले.

               

या वेळी या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक व प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम यांनी त्यांचा यथोचित बुके देवून सत्कार केला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळा सुरक्षा अंतर्गत प्रहारी समितीच्या प्रमुख प्रा.सौ. जे.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन करत केली व कार्यक्रमाचा उद्देश कथन केला.त्या म्हणाल्या की,आम्ही नेहमी युवकांना व्यसनमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करत असतो.परंतु आज पोलीस विभागा मार्फत होणारे हे मार्गदर्शन विद्यार्थांना अधिक मार्गदर्शक ठरणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्भया पथक प्रमुख मेजर तानाजी चंदनशिवे यांनी केले.ते म्हणाले की,शाळा परिसरात पण मोठ्या प्रमाणात  बंदी असलेली मादक कोल्ड्रिंक्स सर्रास विकली जात होती,आता,निर्भया पथक व पोलीस स्टेशन अंतर्गत या सर्वांवर वेळीच लक्ष देवून,त्यावर बंदी घातली आहे.तसेच विद्यार्थी वर्गात जागृती चालू आहे.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडूज शिक्षण विकास मंडळ यांचे मोलाचे सहकार्य झाले.या कार्यक्रमाला ई.11 वी,12 वी  कला,वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर हजर होते.त्याच बरोबर शाळा संकुलाचे सर्व शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला कॉन्स्टेबल सागर पोळ, सौ.राजश्री खाडे,आर. एन.गुरव हे पण हजर होते.त्यांचा शाळा संकुला तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक आर.एस.जगदाळे यांनी आभार मानले.

Comments