साखर 70 रुपये किलो ,ऊस ३५०० टन ? प्रत्यक्ष शेती उत्पादना पेक्षा पेक्षा पूरक उत्पादन फायदेशीर.


साखर 70 रुपये किलो ,ऊस  ३५०० टन ? प्रत्यक्ष शेती उत्पादना पेक्षा पेक्षा पूरक उत्पादन फायदेशीर.

सातारा, दि. 22- राणी जाधव 

साखर आज बाजारात 70 रुपये किलोने विकली जाते. बगॅस 15 ते 20 रुपये किलो, इथेनॉल 70 रुपये लिटर आणि मळी 20 ते 25 रुपये किलोने जाते. एका बाजूला साखर कारखान्यांना प्रत्येक गोष्टीचा दर चांगला मिळतो. 

पण दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला मात्र फक्त 30 ते 32 रुपये किलो दर मिळतो. म्हणजे एका ऊसाच्या 100 किलो गाठी तून कारखानदार करोडो कमावतो आणि ज्याने घाम गाळून ऊस पिकवला त्याच्या हात मात्र भीक पडते.

70 रु.किलो - ग्राहकाकडून भरपूर दर

70 रु.लिटर - केंद्र सरकारची सबसिडी + पेट्रोल कंपन्यांना विक्री

15-20 रु.किलो - पेपर, वीज निर्मिती साठी

20-25 रु.किलो - दारू आणि इतर उद्योगांसाठी

ऊस गेला की त्यातून निघणाऱ्या प्रत्येक घटकाला भाव आहे. फक्त ' उसाला 'भाव नाही. 

कारखाने शेतकऱ्याकडून कमी एफआरपी वर ऊस घेतात. वेळेवर पैसे देत नाहीत. 6 महिने ते 1 वर्ष बिले रखडवतात. तोपर्यंत व्याजाने कर्ज काढून शेतकरी जगतो. आणि त्याच दरम्यान साखर सम्राट मात्र साखर, इथेनॉल आणि बाय- प्रॉडक्टमधून तिहेरी नफा कमावतात.

ऊस हे एकमेव असे पीक आहे की,ज्यातून 4-5 प्रॉडक्ट निघतात. तरीही नफा फक्त कारखानदारांच्या खिशात जातो. शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्ये कडे ढकलला जातो.जेव्हा साखर 70 रु किलो आहे, इथेनॉलला ही 70 रु दर आहे, मग एफआर पी 3500-3800 च्या पुढे का जात नाही?बगॅस आणि मळीच्या कमाईत शेतकऱ्याचा वाटा का नाही? सहकारी कारखाने ' सहकारी 'न राहता काही लोकांच्या खाजगी प्रॉपर्टी कधी झाले?

शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याला जर 30-32 रु. देऊन त्याच्याच ऊसापासून 70 रु .ची साखर आणि 70 रु. चे इथेनॉल बनवून विकणार असाल, तर ही शेती नव्हे, तर ही उघड लूट आहे.सरकारने तातडीने बाय-प्रॉडक्टच्या नफ्यात शेतकऱ्याला हिस्सा द्यावा. वेळेवर 100% एफआर पी + नफा वाटप कायदा करावा. नाहीतर एक दिवस शेतात ऊसच उरणार नाही, आणि साखरेचे कारखाने बंद पडतील.साखर गोड आहे, पण शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळू नका.असे समस्त शेतकरी बांधवांचे मत आहे.

Comments