"फत्त्यापूरच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही" आमदार घोरपडे फत्त्यापूरमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन .
"फत्त्यापूरच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही" आमदार घोरपडे फत्त्यापूरमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन .
कराड दि २३ :- रवी वाकडे
फत्त्यापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मंजूर करून आणलेल्या सुमारे 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन दादांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील तात्या काटकर, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे सर, पंचायत समिती सदस्य मानसिंगराव मोरे, सरपंच अमोल घाडगे, उपसरपंच समाधान घाडगे, शालेय समिती अध्यक्ष तानाजी घाडगे, उपाध्यक्ष नवनाथ कंठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात आमदार मनोजदादा घोरपडे यांचे गावात आगमन झाले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायत सादर केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा दादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेला देणगी देणाऱ्या दात्यांचे आभारही मानण्यात आले.
"फत्त्यापूरच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही" - आमदार घोरपडे
यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, "विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या डिजिटल युगात प्रत्येक शाळेत स्मार्ट स्कूलची निर्मिती करून इंटरॲक्टिव्ह पॅनल बसवून आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देणार आहोत. फत्त्यापूरच्या विकासासाठी मी कधीही कमी पडणार नाही. आजपर्यंत फत्त्यापूर गावाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि यापुढेही मी फत्त्यापूरसाठी सदैव हजर राहीन."
शाळेसाठी 4.5 लाखांचा सीएसआर निधी जाहीर
कार्यक्रमात आबा गिरणवाले अॅग्रो फार्म*च्या वतीने *अनिकेत घाडगे यांनी सीएसआर फंडातून शाळेच्या विकासासाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली.
"दादा सारखे नेतृत्व हे कराड उत्तरचे भाग्य" सरपंच अमोल घाडगे
"आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला मिळाले हे संपूर्ण कराड उत्तरचे भाग्य आहे. प्रत्येकाला सहज उपलब्ध होणारा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन विकासात्मक दृष्टी असणारा नेता कराड उत्तरला मिळाला आहे."
सुनीलतात्या काटकर आणि अजित साळुंखे सर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांच्या वतीने काशिनाथ गुरुजी, सचिन घाडगे, अमोल घाडगे आणि अश्विनी पवार यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिन घाडगे आणि संजय घाडगे यांचा वाढदिवस साजरा करून केक कापून जिलेबीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आनंदराव घाडगे, हेमंत पवार, अधिक घाडगे, अधिक कंठे, विजय घाडगे, तानाजी घाडगे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
-


Comments
Post a Comment