सैदापूर येथे 325 फूट तिरंगा रॅली; हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग.
सैदापूर येथे 325 फूट तिरंगा रॅली; हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग.
कराड दि 14 : रवी वाकडे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज सैदापूर येथे भव्य तिरंगा रॅली आणि ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज ते एसजीएम कॉलेज प्रांगणापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे 325 फूट उंच तिरंगा ध्वज होते. रॅलीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
सकाळी 9.00 वाजता सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज पासून रॅलीला सुरुवात झाली. कृष्णा कॅनॉल जोतिबा मंदिर, यू टर्न, एसजीएम कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बनवडी फाटा मार्गे पुन्हा एसजीएम कॉलेजच्या प्रांगणात ध्वजारोहणाने रॅलीचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला तेजस्विनीताई घोरपडे - जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा, विक्रम बाबा पावसकर - प्रदेश उपाध्यक्ष, नंदाताई यादव - सभापती पंचायत समिती, अनिताताई वेताळ - उपसभापती यांच्यासह सागर शिवदास - जि.प. सदस्य, माधवीताई पाटसुपे, प्रियांका पळसे, धैर्यजाताई माने, कोमलताई यादव - पं.स. सदस्य उपस्थित होते.
सीमाताई घार्गे, प्रतिभाताई कांबळे, राजश्री पवार, फत्तेसिंग जाधव सरपंच, अनिल जाधव उपसरपंच, तुकाराम नलवडे आबा यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, वायसी कॉलेज, वेणूताई चव्हाण कॉलेज, विद्याश्री अकॅडमी, रॉयल अकॅडमी, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, पावकेश्वर विद्यालय आणि सैदापूर जिल्हा परिषद शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे नियोजन सैदापूर ग्रामपंचायत सरपंच फत्तेसिंग जाधव भैय्या, पंचायत समिती सदस्य माधवीताई पाटसुपे, कोपर्डे मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, हर्षद देसाई, नाना पाटसुपे, अनिल जाधव यांनी केले होते.
देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे सैदापूर परिसरात देशप्रेमाची लहर पसरली होती.



Comments
Post a Comment