उंब्रज पोलिसांची कारवाई : देशी दारूसह दुचाकी जप्त, एकावर गुन्हा दाखल.मोटारसायकल सह एकूण 26,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

उंब्रज पोलिसांची कारवाई : देशी दारूसह दुचाकी जप्त, एकावर गुन्हा दाखल.मोटारसायकल सह एकूण 26,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कराड दि 22 :- रवी वाकडे
उंब्रज पोलिसांची कारवाई : देशी दारूसह दुचाकी जप्त, एकावर गुन्हा दाखल.मोटारसायकल सह एकूण 26,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
मौजे भोसलेवाडी (ता. कराड) येथे कमानीजवळ उंब्रज ते गणेशनगर कोटी सर्व्हिस रोडवर अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 4 लिटर 320 मिली देशी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 26,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अनिल देशमुख हे पेट्रोलिंगवर असताना भोसलेवाडी कमानीजवळ संशयितरित्या जाणारी मोटारसायकल (MH 11 AV 2005) थांबवली. झडती घेतली असता मोटारसायकलवर पांढऱ्या तंगुसच्या पिशवीत 'कृष्णा संत्रा पहिली धार' लेबल असलेल्या 180 मिलीच्या 24 सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

या प्रकरणी देवराज दिपक काळे (वय 19, रा. गणेशनगर कोटी, ता. कराड) या तरुणाविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 342/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत 1,920 रुपये किमतीच्या 24 दारूच्या बाटल्या व 25,000 रुपये किमतीची हिरो होंडा दुचाकी असा एकूण 26,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमुना तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम पो.हवा. जगताप यांनी केले असून पुढील तपास पो.हवा. पवार हे आहेत.

Comments