गोवा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातारा हिल रनर्स च्या तीन धावपटूंची 120 किमीची दमदार कामगिरी.


गोवा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातारा हिल रनर्स च्या तीन धावपटूंची 120 किमीची दमदार कामगिरी.
सातारा दि 12 :- राणी जाधव
गोवा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातारा हिल रनर्स च्या तीन धावपटूंची 120 किमीची दमदार कामगिरी.
गोवा येथे झालेल्या गोवा अल्ट्रा मॅरेथॉन या अत्यंत खडतर 120 किमी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातारा जिल्ह्यातील तीन धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
विश्वनाथ नारायण क्षीरसागर (आर्मी, भाटमरळी) यांनी 120 किमी अंतर 16 तास 35 मिनिटे 50 सेकंदांत पूर्ण केले. मयुरेश हिंदुराव शिंदे (कर सल्लागार, सातारा) यांनी 19 तास 41 मिनिटे 41 सेकंदांत, तर दिपक दिनकर कदम (डी.के., नागठाणे) यांनी 19 तास 41 मिनिटे 46 सेकंदांत शर्यत पूर्ण केली.

"नोट फोर द विक ऑफ विल"अशी ओळख असलेल्या या शर्यतीचा 120 किमी मार्ग पालोलेम बीचपासून सुरू होऊन नेत्रावली वन्यजीव अभयारण्याच्या खडतर जंगल परिसरातून जात बोगमाळो बीच येथे समाप्त होतो. पावसाळी वातावरण, दमट हवामान, जंगलातील चढ-उतार आणि सुमारे 1,850 मीटरपेक्षा अधिक चढउतार यामुळे ही शर्यत धावपटूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी घेणारी ठरली. 120 किमी शर्यतीसाठी 20 तासांचा cut-off होता.

या तिन्ही धावपटूंनी ही आव्हानात्मक शर्यत यशस्वीपणे पूर्ण करून साताऱ्याच्या अल्ट्रा रनिंग क्षेत्राची मान उंचावली आहे.

सर्व सातारा हिल रनर्स, नागठाणे सायकल ग्रुप, अतीत रनर्स अँड ट्रेकर्स ग्रुप यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी डॉ सुधीर पवार  , डॉ संदीप काटे  ,यश अवकीरकर, याचे प्रामुख्याने मार्गदर्शन लाभले.

Comments