कृष्णा नदीवरील दोन ट्रान्सफॉर्मर फोडून 10 लाखांचे तांबे लंपास; 1720 लिटर ऑईल नदीकाठावर सांडले.
उंब्रज दि २४ :- रवी वाकडे
कृष्णा नदीवरील दोन ट्रान्सफॉर्मर फोडून 10 लाखांचे तांबे लंपास; 1720 लिटर ऑईल नदीकाठावर सांडले.
कृष्णा नदीकाठावरील शेरे शिवारात अज्ञात चोरट्यांनी दोन मोठ्या कृषी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 890 किलो तांब्याच्या कॉईल्स चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे 10 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून 1720 लिटर ऑईल सांडून मोठे नुकसान करण्यात आले आहे.
याबाबत यशवंत विनायक चव्हाण (रा. पेरले) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं. 343/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 303(2), 324(5) व सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध अधिनियम 1984 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 24 ऑगस्ट पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी मौजे पेरले येथील कृष्णा सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा 500 KVA चा आणि यशवंतराव चव्हाण सहकारी पाणीपुरवठा संस्था, शिरगावचा 1250 KVA चा असे दोन ट्रान्सफॉर्मर फोडले.
चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचे नट-बोल्ट काढून 620 लिटर (किं. 1,05,400 रु.) व 1100 लिटर (किं. 1,87,000 रु.) असे एकूण 1720 लिटर ऑईल जमिनीवर सांडून दिले. त्यानंतर 500 KVA मधील 390 किलो (किं. 4,68,000 रु.) आणि 1250 KVA मधील 500 किलो (किं. 6,00,000 रु.) वजनाच्या कॉपर वाइंडिंग कॉईल्स व पट्ट्या चोरून नेल्या.
या घटनेमुळे दोन्ही संस्थांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उंब्रज पोलिस ठाण्याचे मपोहवा घाडगे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मपोउपनिरी घोरपडे करीत आहेत
.jpg)

Comments
Post a Comment