सातारा ZP मध्ये "पती राज" चा आरोप! RTI नंतर उघड होणार सत्य,?
तारळे दि 15 :- राणी जाधव
सातारा जिल्हा परिषदेतील महिला आरक्षणाच्या जागेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप साताऱ्यातून समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या [ तारळे मतदारसंघातील सदस्या सौ. स्वपना अभिजीत पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पती अभिजीत पाटील हे सर्व कामकाज पाहत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
बैठकांमध्ये सदस्या अनुपस्थित राहून पती उपस्थित राहतात, नागरिकांच्या तक्रारीही ते सोडवतात असा आरोप आहे. या प्रकरणी एका नागरिकाने जिल्हा परिषदेच्या CEO कार्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज करून गेल्या काहि दिवासा मधिली हजेरी स्वाक्षरी व तक्रारींची माहिती मागितली आहे.
महाराष्ट्र ZP अधिनियम 1961 नुसार निवडून आलेल्या सदस्यानेच काम करणे बंधनकारक आह पण तारळे भागात वेगळे चित्र निर्माण झाले आहे झेडपी सदस्य घरी पती दौऱ्यात .तारळे भाग हा राजकारणा चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आहे पण राजकारण नको ते वळण घेत आहे लोकांना आपल्या बाजुने वळवून घेण्या साठी पैसा खर्च केला जातो आहे किवा लोकानं चे उद्योग धंदे बंद केले जातात . जनते मधे तिव्र नाराजी पसरली आहे जनते ने एक प्रश्न विचारला आहे पालक मंत्री यांनी खर्च केला जात असणारा पैसा नक्की कोणाच्या तिजोरी मधील आहे सरकार च्या कि स्वताच्या ??लोक हितासाठी वापर नारा पैसा अश्या प्रकारे खर्च करून काय भेटते जनते चा सवाल आहे . लोक हिता साठी तुम्हाला निवडले गेले होते पण तुम्ही मात्र लोकांन च्या पोटावर पाय आनताआहे पुढील काळात अजुन कोणते तळ गाठणार आहे हा प्रश्न लोक विचारत आहेत.

Comments
Post a Comment