मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत पाच महिन्याच्या बाळाला दिल्लीत मिळाले जीवनदान.
सातारा दि 11 :- रवी वाकडे
मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत पाच महिन्याच्या बाळाला दिल्लीत मिळाले जीवनदान, मुंबई मधील एका पाच महिन्याच्या बाळाला हार्ट चे ऑपेरेशन करायला सांगितले होते,
त्या बाळाच्या वडिलांची परिस्तिथी बेताचीच होती, मग त्यानी त्या बाळाचे ऑपेरेशन हे सरकारी दवाखान्यात करायचे ठरवले होते, त्यासाठी त्यांनी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये बाळाला ऍडमिट केले होते, पण त्याला तीन बॅग रक्त लागेल असे त्यांना सांगण्यात आले, त्यावेळी त्या बाळाच्या वडिलांनी मुंबई मधील रक्त दान क्षेत्रातील सहकारी मित्रांना कॉल केला आणि विनंती केली कि त्या लहान बाळासाठी रक्ताची मदत करावी,
मग मुंबई मधील सहकाऱ्यांनी उंब्रज मधील मदत रक्ताची संघटना चे अध्यक्ष परेशकुमार कांबळे यांना कॉल करून सर्व परिस्तिथी सांगितली,
एवढ्याश्या लहान बाळाचे हार्ट चे ऑपेरेशन करायचे आहे हे ऐकून त्यांना सुद्धा कसे तरी वाटले,
मग ही बाब मी दिल्ली मधील रक्तदान क्षेत्रातील त्यांचे मित्र दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत असलेले रवींदर धारीवाल यांना सांगताच त्यांनी दिल्ली पोलीस मधील आपले एक सहकारी सोनू भांकर यांस एम्स हॉस्पिटल मध्ये रक्तदान करण्यास पाठवले, आणि हॉस्पिटल मध्ये कॉल करून तेथील अजून एक बॅग त्या बाळाला उपलब्ध करून दिली, तसेच त्या बाळा सोबत असलेल्या वडिलांनी
ही रक्तदान केले दिल्ली,
उंब्रज सारख्या एका छोट्या गावात राहून सुद्धा परेशकुमार यांनी दिल्लीत एका पाच महिन्याच्या बाळाला जीवनदान देण्यात यशस्वी झाले , ऐवढे मोठे पुण्य कार्य त्यांच्या हातून घडतेय याचे कौतुक वाटतेय,
मदत रक्ताची संघटना ही गेली कित्येक वर्षे खूप लोकांना रक्ताची मदत करून आपली निःस्वार्थ भावना जपत आहे,
Comments
Post a Comment