मी अनुभवलेले एक संवेदनशील नेतृत्व साहेब..
यशवंत दादासो पवार (नाना)
कराड दि 28 ;- रवी वाकडे
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांचा 29 जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त कांही शब्द......
गेली 22 वर्ष झाली आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्याकडे काम करत असताना काही कालावधीनंतर म्हणजेच गेल्या 7-8 वर्षापासून स्विय सहायक म्हणून काम करायची संधी मला मिळाली. वास्तविक काम करताना अनेक वेगवेगळे अनुभव साहेबांच्या सहवासात अनुभवता आले. सामान्य लोकांची कामे जलदगतीने करण्यासाठी साहेबांचा हातखंडा आहे.
गेली 22 वर्ष सतत साहेबांच्या सहवासात राहून साहेबांना जवळून पाहण्याची आणि त्यांना समजून घेण्याची खूप मोठी संधी मिळाली. हे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य समजतो. कारण साहेबांच्या सहवासामुळे अनेक लोकांशी माझा संपर्क आला.
प्रत्येक कामाविषयी असलेले प्रेम आणि जबाबदारी, कोणतेही समाजकार्य असो किंवा विकासकामे असोत. प्रत्येक गोष्ट ही पूर्ण विचारपूर्वक आणि बारकाईने करण्याकडे आदरणीय साहेबांचा कल असतो. जनहिताची कामे करण्यासाठी साहेब नेहमीच तत्पर व संवेदनशील असतात. यामुळेच साहेब हे जनमानसांत प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत.
एक संवेदनशील मंत्री म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने त्यांचे रूप पाहिलेले आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे तौक्ते चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी असो अथवा नुकताच पाटण तालुक्यातील आबेघर तर्फ मरळी या गावावर दरड कोसळली. या घटनेमध्ये गुरेढोरे आणि गावातील माणसे चिखलाच्या ढिगारयाखाली गाडले गेले, कांहींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती साहेबांना मिळताच, मृतांच्या नातेवाईकांना चिखलातुन पायी चार-पाच किलोमीटर अंतर कापून जाऊन भेटले त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. तसेच परिस्थितीची पाहणी करून दुःखी कुटुंबियांचे सांत्वन केले. मायेचा आधार दिला. सरकार म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, असा धीर दिला, प्रशासनाला योग्य ते आदेश दिले, ही एक असामान्य अशी बाब होय.
अश्या आभाळाएवढ मोठे मन असलेल्या प्रतिभावान माणसाची गेली 22 वर्ष मला. सावली व सहवास मिळाला आणि अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्यांच्यासाठी काम करण्याची एक सुवर्णसंधी मिळाली. आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करताना मनस्वी आनंद मिळतो आणि साहेब ज्या तत्परतेने सर्वसामान्यांची कामे करतात ते पाहून मन भरून येते. लाखो कार्यकर्ते, शेतकरी, सभासद, नागरिक यांना नावानिशी हाक मारून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. आदरणीय साहेब हे लाखोंचे पोशिंदे आहेत, याचा त्यांना कधी गर्व नसतो.
आदरणीय साहेब है सुस्वभावी, निगीं, निरपेक्ष भावनेने मदत करणारे, मैत्री जपणारे, सतत कार्यशील असणारे, चौफेर विकासाचा ध्यास असलेले कराड उत्तरचे अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट नेतृत्व मा. श्री बाळासाहेब पाटीलसाहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा.
शुभेच्छूक -
यशवंत दादासो पवार (नाना)



Comments
Post a Comment