कर्मयोगी लोकनेते मा.श्री बाळासाहेब पाटीलसाहेब .
कराड दि 28 : - रवी वाकडे
कर्मयोगी लोकनेते मा.श्री बाळासाहेब पाटीलसाहेब ,
सन्मान कर्तृत्वाचा.
युवकांची प्रेरणा तुम्ही,
कार्याची आस तुम्ही,
संस्काराचा स्त्रोत तुम्ही,
विचारांचा आधार तुम्ही
ध्यास आमचा श्वास तुम्ही.
राजकीय जीवनातील प्रेरणास्थान, शांत, संयमी नेतृत्व, विकासाचं व्हिजन व दुरदृष्टी असलेले राष्ट्रवादीचे नेते, प्रचंड अभ्यासू व अथक मेहनत घेणारे, आपल्या शूर आणि निर्भय नेतृत्वाबद्दल नवीन आकांक्षा, ध्येय घेवून सतत उत्साही असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्हयाचे माजी पालकमंत्री मा. श्री बाळासाहेब पाटील साहेब होत. बुधवार दि. 29 जुलै 2026 या त्यांच्या वाढदिवसानिमित्त....
हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर, आपणचि जहाला। ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्या प्रमाणे सबंध विश्वाला आपले घर मानून आपण त्यापैकीच एक आहोत अशी भावना मनामध्ये ठेवून सतत समाजासाठी कार्यरत राहणारे नेतृत्व म्हणजे सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील. आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांच्या सामाजिक कार्याचा मोठा वारसा त्यांना लाभला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची पाठराखण करत व आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याचा वसा जोपासत सर्व लहानथोर, अबालवृध्द मंडळीमध्ये सदैव राहून सर्वांसाठी कार्य करत राहणे है फार मोठे कौशल्य साहेबांनी प्राप्त केले आहे. सामाजिक कार्य करत असताना सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकन्यांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहणे, सर्वांना समान न्याय देणे, सर्वांशी सौजन्याने वागणे, जवळीक ठेवणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. तसेच विधानसभा सदस्य या नात्याने त्यांनी 1999 पासून चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये चार तालुके असून बहुतांश ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्यामध्ये सर्व गावांना समान न्यायाने निधी देऊन अनेक छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. विकास ही सातल्याने सूरु राहणारी प्रक्रिया असून खरा विकास हा शेतीला पाणी देणे होय म्हणून साहेबांनी कारखान्याच्या माध्यमातून किवळ ता. कराड व पिंपरी ता. कोरेगांव येथे आणि शासनाच्या योजनेमधून कोरीवळे ता.कराड येथे ओढा जोड प्रकल्प राबविले आहेत.
कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून पोकलेन व जेसीबी मशीन तात्काळ उपलब्ध करून देऊन ओद्यामधील गाळ काढणे व ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच शासनाचे माध्यमातूनही अनेक छोटे-मोठे साठवण बंधारे, एम आय टैंक, के. टी. वेअर कम ब्रीज बांधणेस त्यांनी विशेष प्राधान्य दिले. रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीप्रमाणे चांगल्या कामासाठी ही संघर्ष करावा लागतो. शासनाचा प्रतिनिधी या नात्याने साहेबांनी आमदार स्थानीक विकास निधी, डोंगरी विकास निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण साकव, विशेष घटक साकव, ल.पा. साठवण बंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, अंगणवाडी इमारती, सामाजिक सभागृहे, व्यायामशाळा बांधणे, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख राज्यमार्ग इल्यादींची जास्तीत जास्त सुधारणा करण्यासाठी व जनसुविधा, नागरी सुविधा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच जलजिवन मिशन योजना, क वर्ग यात्रास्थळ, क वर्ग पर्यटन स्थळ निधी इत्यादीच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून कामे पूर्ण केली आहेत.सहकार व पणन मंत्री म्हणून आदर्शवत काम.
साहेबांनी नेहमीच यशवंतराव चव्हाणसाहेब व शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारांची पाठराखण केली असून समाजाप्रती निष्ठेने काम सुरू ठेवले आहे. साहेबांनी सहकारातील केलेल्या आदर्शवत कामाची दखल घेऊन शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये साहेबांना सहकार, पणन मंत्री महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामाध्यमातून साहेबांनी राज्यासाठी, जिल्ह्यासाठी व कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भरीव असे कामकाज सुरु ठेवले आहे. हे सर्व करीत असताना अत्यंत शांत, संयमाने कोणत्याही टीकाटिपणीकडे लक्ष न देता आपल्या कार्यबाहुल्यामध्ये व्यस्त राहून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्याकडे सतत भर दिला आहे.



Comments
Post a Comment