राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री. बाळासाहेब पाटील यांचा बुधवार दि. २९/०७/२०२६ रोजी वाढदिवस असून, वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन .


 राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री. बाळासाहेब पाटील यांचा बुधवार दि. २९/०७/२०२६ रोजी वाढदिवस असून, वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन . 



कराड  दि  28 :- रवी वाकडे 
आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकहितासाठी सदैव समर्पित असे नेतृत्व मा.ना. स्व. अजितदादा पवार यांचे काही महिन्यांपुर्वी दुखःद अपघाती निधन झाले, आपल्या परिसरासह राज्याच्या विकासामध्ये मोलाचे सहकार्य त्यांनी दिले, त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली. पेपरफुटी आणि अनियमिततांबाबत NTA ने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातून काही विद्यार्थ्यांनी निराशेमध्ये आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थितीमध्ये मा. श्री बाळासाहेब पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना केले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी होर्डिंग्ज् व जाहिराती प्रसारित न करता, तो खर्च वाचवून त्या निधीतून शेतकऱ्यांना, गरजुंना व विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून स्व. अजितदादांना व आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पित करावी, अशी माहिती माजी मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Comments