उंब्रज बसस्थानक आणि महाविद्यालय परिसरात एका स्प्लेंडर दुचाकीवरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वरून उंब्रज पोलिसांनी संबंधित दुचाकी चालकास समज दिला.
उंब्रज बसस्थानक आणि महाविद्यालय परिसरात एका स्प्लेंडर दुचाकीवरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वरून उंब्रज पोलिसांनी संबंधित दुचाकी चालकास समज दिला.
उंब्रज दि 16 :- रवी वाकडे
उंब्रज बसस्थानक आणि महाविद्यालय परिसरात एका स्प्लेंडर दुचाकीवरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी उंब्रज पोलिसांना वारंवार मिळत होत्या. या दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे,वाढदिवसाच्या निमित्ताने गोंधळ घालणे तसेच महाविद्यालय आणि बसस्थानक परिसरात विनाकारण फेऱ्या मारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात असल्याचे आढळून आले होते.
महाविद्यालयाच्या मार्गावरील व्यापारी आणि प्रवाशांनी याबाबत उंब्रज पोलिसांकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार संबंधित हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीच्या मागील नंबर प्लेटवर "छकुली" असे नाव लिहिलेले होते.
माहितीची पडताळणी करून उंब्रज पोलिसांनी संबंधित दुचाकीचा शोध घेतला आणि कारवाई करत ती ताब्यात घेतली. यावेळी संबंधित युवकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली.
तसेच पालकांच्या उपस्थितीत त्यांचे समुपदेशन करण्यात आले असून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत सूचना देण्यात आल्या.
ग्रामस्थ, महिला प्रवासी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उंब्रज पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
उंब्रज पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही केले आहे.
Comments
Post a Comment