शेतकरी कर्जमुक्ती निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत जाहीर सत्कार.
मुंबई, दि 16:- रवींद्र वाकडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ राबवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश तसेच राज्यातील शेतकरी बंधू-भगिनींच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा गौरव करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, पशुपालक व मच्छिमारांना शेतकरी दर्जा, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, दापचरी येथील आंतरराष्ट्रीय कृषी बाजार आणि कृषी समृद्धी योजना अशा महत्त्वाकांक्षी योजनांमुळे राज्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्यास मदत होत असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विकास आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व प्रेरणादायी व विश्वासार्ह असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या जाहीर सत्कार सोहळ्यास भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे, भाजपा महाराष्ट्र किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्यासह अनेक आमदार, भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यभरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment