तहसीलदार मॅडम यांच्या आश्वासनानंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित.तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली आणी आठ दिवसांत मागण्यांवर सकारात्मक कारवाईचे आश्वासन.


तहसीलदार मॅडम यांच्या आश्वासना
नंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित.
तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली आणी आठ दिवसांत मागण्यांवर सकारात्मक कारवाईचे आश्वासन.
उंब्रज दि  09 :- रवींद्र वाकडे 
तहसीलदार मॅडम यांच्या आश्वासना
नंतर रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित.
तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली आणी आठ दिवसांत मागण्यांवर सकारात्मक कारवाईचे आश्वासन.
  छत्रपती शिवाजी महाराज चौक, उंब्रज येथे विविध मागण्यांसाठी रामदास दिलीप काटवटे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. सलग दोन ते तीन दिवस सुरू असलेल्या या उपोषणाची सांगता तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर झाली.

तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांमुळे काटवटे यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर पुढील आठ दिवसांच्या आत सकारात्मक व न्याय्य कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

प्रशासनाच्या या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून रामदास दिलीप काटवटे यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

उपोषण स्थगित करताना रामदास काटवटे यांनी इशारा दिला की, प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही केली नाही, तर ते पुन्हा आमरण उपोषणासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments