उंब्रज–शिवडे मार्गावरील साकव पुलाचा भाग खचला; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय, तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.

 उंब्रज–शिवडे मार्गावरील साकव पुलाचा भाग खचला; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय, तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.

उंब्रज दि ३१   :रवींद्र वाकडे

उंब्रज–शिवडे मार्गावरील साकव पुलाचा भाग खचला; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय, तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.

 काल झालेल्या मुसळधार पावसामुळे उंब्रज–शिवडे मार्गावरील साकव पुलाला आज पूर आला. या पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे पुलाच्या शिवडे गावाच्या बाजूचा भाग पूर्णपणे खचला असून, हा पूल आता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.सध्या या पुलावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक झाले असून, आणखी पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यास उर्वरित पुलाचा भागही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पुलाचा वापर करून दररोज शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ प्रवास करतात. मात्र पुलाचे नुकसान झाल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार असून, दळणवळणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

याची गंभीर दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी त्वरित पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी शिवडे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे .

Comments