सडावाघापूर येथे हुल्लडबाजी करणाऱ्या वर तारळे पोलीस यांची सक्त कारवाई.




सडावाघापूर येथे हुल्लडबाजी करणाऱ्या वर तारळे


 पोलीस यांची सक्त कारवाई.

                

तारळे दि २६  :- राणी जाधव  

     पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे हुल्लडबाजी करणाऱ्या वर तारळे पोलीस यांची सक्त कारवाई करण्यात आली आहे .तारळे पासुन  काही अंतरावर असलेल्या सडावाघापूर येथे सध्या उलटा धबधबा जग प्रसिद्ध  झाला आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले दान  लोकांचे लक्ष वेधून घेत आहे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी पाहावयास मिळते . असे असले तरी काही लोक याला गालबोट लावत आहेत दारु पिऊन धिंगाणा घालत आहेत गाड्या बेभान होऊन चालवत आहेत .

                   

 पोलीस सतत कार्यरत आहेत लोकांना वारंवार सावध करत आहेत तरी पण काही केल्या लक्षात येते नाही हे लक्षात घेऊन आज सकाळी तारळे ते सडावाघापूर जाणारे रोडवर हुल्लडबाजांवर कारवाई केली. 35-40 गाड्या तपासल्या त्यातील 14 गाड्यांवर कारवाई केली 8500/- रुपये दंड केला आहे या वेळी उपस्थित पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा मार्गदर्शनाखाली सागर खबाले यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक थोरवे, पोलिस आमलदार पोतेकर व माने यांनी कारवाई केली.

Comments