आर्वी येथे सोमवारी आमदार मनोजदादांचा 'जनता दरबार' कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवणार; सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित.


 आर्वी येथे सोमवारी आमदार मनोजदादांचा 'जनता दरबार' कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवणार; सर्व तालुकास्तरीय अधिकारी  उपस्थित.
 कराड दि 16 :- रवी वाकडे
आर्वी येथे सोमवारी आमदार मनोजदादांचा 'जनता दरबार' कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवणार; सर्व तालुकास्तरीय अधिकारी राहणार उपस्थित.आर्वी, ता. कोरेगाव: कराड उत्तर मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांचे महसूल, पोलीस, वीज, रेशन, शेतीसह विविध प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी *आमदार मनोजदादा घोरपडे* यांच्या अध्यक्षतेखाली *'जनता दरबार'* आयोजित करण्यात आला आहे.


*सोमवार, दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता, ज्ञानेश्वर मंडप, आर्वी ता. कोरेगाव* येथे हा जनता दरबार होणार आहे.

*सर्व विभागांचे अधिकारी एकाच छताखाली*  
या जनता दरबारात उपविभागीय अधिकारी कोरेगाव, तहसीलदार कोरेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव, गटविकास अधिकारी कोरेगाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रहिमतपूर, तालुका आरोग्य अधिकारी, वन विभाग अधिकारी, शिक्षण अधिकारी, तालुका महावितरण अधिकारी (MSEDCL), तालुका भूसंपादन अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी, तालुका पाणीपुरवठा अधिकारी, तालुका कृषी अधिकारी असे *सर्व तालुकास्तरावरील शासकीय अधिकारी* उपस्थित राहणार आहेत.
शेतजमीन मोजणी नवीन वीज कनेक्शन रेशनिंग कार्ड संबंधित तक्रारी महसूल विभागातील प्रकरणे पोलीस स्टेशन संबंधी तक्रारी,आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी विभागातील इतर समस्या

*आयोजक*: सदर जनता दरबाराचे आयोजन *आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच* यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कोरेगाव तालुक्यातील कराड उत्तरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्न सोडवले जाणार आहेत.


Comments