हिंगणोळे येथिल ओढ्यात अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास ओढ्यात विषारी केमिकल टाकल्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित.


हिंगणोळे येथिल ओढ्यात अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास ओढ्यात विषारी केमिकल टाकल्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित.
कराड दि 09 :- रवी वाकडे
हिंगणोळे येथिल ओढ्यात अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास ओढ्यात विषारी केमिकल टाकल्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित झाले आहे. हिंगणोळे दि 9/07/2026 रोजी सकाळी सुमारे पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञात टँकर ने हिंगणोळे गावच्या वेशीच्या लागत अज्ञात इसमाने टँकर च्या साह्याने विषारी असे केमिकल रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात ते कॅमिकल ओतून सदर टँकर वाला निघून गेला आहे. यामागे पण एकदा 2/3 महिन्यापूर्वी असेच कॅमिकल ओतून अज्ञात टँकर वाला गेला होता. त्याचे परिणाम शेजारी ओढा असल्यामुळे ते पाणी ओढ्यात उतरते. त्यामुळे ओढ्याचे पाणी प्रदूषित होते. व ओढ्याच्या लागत असणारे घरे v त्याच पद्धतीने Z.P. शाळा व गावातले असणारे वस्ती घरे त्या ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने असल्यामुळे त्या कॅमिकल च्या वासाने तेथील लोकांना मळ मळ व उलटी सारखे होत आहेत,
 एवढा त्या कॅमिकल चा वास आहे. त्यामुळे आरोग्यास लहानापासून वृद्धांपर्यंत श्वास घेण्यास त्रास होत आहे. व ततेच पाणी केमिकल चे पाणी खाली तारळी नदीला मिळते व त्या तारळी नदी लागत 100ते 200 फुटाच्या अंतरावर हिंगणोळे गावाच्या पिण्याच्या विहीर आहे. त्या विहिरीच्या पाण्यामध्ये ते केमिकल मिक्स होण्याचे दाट शक्यता नाकारू शकत नाही त्यामुळे ते पाणी पिल्यास विविध प्रकारचे आजार होऊ शकतील तर कृपया प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन अज्ञात चालकावर व टँकर वर योग्य ती कारवाही व्हावी. तरी हिंगणोळे येथील ग्रामस्थानी उंब्रज पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रार दिलेली आहे....

Comments