मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये रक्तदान, मोतीबिंदू शिबिर व शेती पंप वाटप.




 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये रक्तदान, मोतीबिंदू शिबिर व शेती पंप वाटप.

                     

कराड दि २४ :- रवी वाकडे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये रक्तदान, मोतीबिंदू शिबिर व शेती पंप वाटप.महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत रहिमतपूर येथे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम ताई यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला सातारा-सांगली विधानपरिषद आमदार धैर्यशीलदादा कदम, खटाव मान साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे, रहिमतपूर नगराध्यक्षा वैशाली माने, निलेश माने, मंडल अध्यक्ष रणजित माने, एन. ए. राऊत सर, जयंत माने सर यांच्यासह रहिमतपूर येथील सर्व नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो युवकांनी रक्तदान करून मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.

याचबरोबर उंब्रज येथे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शेतकऱ्यांसाठी देखील विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मसूर येथे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतीसाठी औषध फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यावेळी बोलताना संग्रामबापू घोरपडे म्हणाले,"सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या तत्वावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये आरोग्य, शेती आणि समाजसेवेचे उपक्रम घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत."

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Comments