तळबीड पोलिसांची अवैध दारू विक्री वर धडक कारवाई.


तळबीड पोलिसांची अवैध दारू विक्री वर धडक कारवाई.
कराड दि 15 :- रवी वाकडे
तळबीड पोलिसांची अवैध दारू विक्री वर धडक कारवाई , बेलवडे गावाच्या हद्दीमध्ये कंदील बार शेजारी महामार्गालगत पत्र्याचे शेडचे आडोश्याला आरोपी  नामे  गौरव गजानन जाधव व  शुभम विजय जाधव दोन्ही रा बेलावडे हवेली हे अवैधरित्या दारूची विक्री करीत असतानाची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांचेवर कारवाई करून त्यांचेकडून  180ML च्या देशी संत्रा नावाच्या 21 दारूच्या बाटल्या त्याची किंमत 1680 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अंमलदार सागर कोकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार योगेश भोसले करीत आहेत.
    सदरची कारवाई API रविंद्र भोरे, PSI खराडे, PC अभय मोरे, PC सागर कोकरे, महिला पोलीस शिपाई पल्लवी मोहिते यांनी केली.

Comments