वारकऱ्यांची दिंडीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला
वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
जेजुरी दि १३ : मनोज मोहिते
वारकऱ्यांची दिंडीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला
वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
श्रद्धा आणि
भक्तीच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी एक भीषण अपघाताचे
ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड-जेजुरी मार्गावरील दिवे घाट
परिसरातून मार्गस्थ होत असताना एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात
तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, १६ वारकरी गंभीर जखमी
झाले आहेत.
प्राथमिक तपासानुसार हा अपघात पुढीलप्रमाणे घडला: सासवड–जेजुरी रस्त्यावर बेलसर
टोल नाक्याजवळ वारकऱ्यांची दिंडी चालत होती.दिंडीसोबत चालणाऱ्या एका मालवाहू
ट्रकने अचानक नियंत्रण गमावले आणि रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या महिला
वारकऱ्यांच्या समूहाला धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाने तापासाठी औषध
घेतले होते आणि त्याला चक्कर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले, असा संशय व्यक्त करण्यात
आला आहे. मात्र, ही बाब अद्याप तपासाधीन
आहे आणि अधिकृत चौकशीनंतरच अंतिम कारण स्पष्ट होईल. या अपघातात ३ महिला
वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि ४ जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. ही अत्यंत
दुर्दैवी घटना असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे


Comments
Post a Comment