लिंगायत महासंघाची धाराशिव येथे रविवारी महत्त्वाची बैठक,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ,प्रा सुदर्शनराव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती.


लिंगायत महासंघाची धाराशिव येथे रविवारी महत्त्वाची बैठक,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ,प्रा सुदर्शनराव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती.
सातारा दि 11 :- प्रा अजय शेटे
लिंगायत महासंघाची धाराशिव येथे रविवारी महत्त्वाची बैठक
धाराशिव-लिंगायत महासंघ शाखा धाराशिव च्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत लिंगायत महासंघाच्या धाराशिव जिल्हा, धाराशिव शहर, धाराशिव तालुका, तुळजापूर तालुका उमरगा तालुका ,लोहारा तालुका ,नळदुर्ग , कळंब,वाशी भुम ,परंडा आदी ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत तसेच जिल्हा कार्यकारिणीची पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे. 
तसेच आगामी जनगणनेत लिंगायत समाजाने काय लिहावे यावर चर्चाही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिराजदार सर हे उपस्थित राहणार आहेत तरी धाराशिव शहर तालुका जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी व लिंगायत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे,  तसेच लिंगायत महासंघाचे प्रा.अनिल कारंडे, दत्तात्रेय बिराजदार , संगमेश्वर स्वामी ,अनिल बचाटे,ॲड नंदकिशोर मैराण,ॲड,अजय वाघाळे, महेश उपासे, बाळासाहेब बेद्रे,शंकर जट्टे, बसवराज बिडवे,मकरंद शिंगणापुरे, शंभुलिंग स्वामी, गणेश डोंगरे, बाबुराव विश्वेश्वर, महादेव विश्वेश्वर,चितांबर आबा अवधूत, अमृता बचाटे अनिल बचाटे,  मनोज पोतदार,आदींनी आवाहन केले असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले

Comments