हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये शिक्षक - पालक संघ सहविचार सभा संप्पन्न.
सातारा, दि.7- प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित, हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये शैक्षणिक वर्ष सन 2026.27 अंतर्गत पहिली शिक्षक - पालक सहविचार सभा शनिवार दि.4.7.2026 रोजी स.10 ते 11.45 या वेळेत मुख्याध्यापिका सौ. बी.एस.माने मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी प्रथम श्री विद्यादेवी सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या नंतर सर्व पालक प्रतिनिधी यांच्या सहविचाराने सभेची सुरुवात झाली.
या सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक डी.एम. लहारे यांनी केले.ते म्हणाले की,या नवीन वर्षातील हि पहिलीच पालक सभा असून,संपूर्ण प्रथम सत्राचे नियोजन येथे करण्यात आले आहे.
या नंतर उप मुख्याध्यापिका सौ.एस. पी.जोशी मॅडम म्हणाल्या की,विद्यार्थी हिताच्या सर्व समित्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तयार केल्या गेल्या असून,त्या माध्यमातून विद्यार्थी विकास साधला जाणार आहे.
या नंतर मुख्याध्यापिका सौ. बी.एस.माने मॅडम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
त्या म्हणाला की,शाळेत आता मोठ्या प्रमाणावर शिस्त वाढीसाठी प्रयत्न केले गेले आहेत.विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसी टीव्ही कॅमेरा चित्रीकरण सुविधा उपलब्ध आहे.ज्युनियर कॉलेज विभाग साठी ई.11 वी विज्ञान शाखेस नुकतीच मान्यता मिळाली आहे.
तसेच आता हस्ताक्षर क्लास,संगीत क्लास त्याच बरोबर विविध स्कॉलरशिप परीक्षा,विद्यार्थांच्या भावी वैद्यकीय व अभियांत्रिकी शैक्षणिक आयुष्यात उपयोगी पडणारे फाऊंडेशन कोर्स शाळा संकुलात आयोजित करण्यात येणार आहेत.
या नंतर सर्व शैक्षणिक बदलाचा आढावा घेत श्री.संतोष स्वामी सर यांनी सर्वांचे आभार मानले.
या वेळी पालक संघाची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष पालक,शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment