अहिल्यानगर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थिती; रुग्णसेवेचे नवे दालन खुले.
अहिल्यानगर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थिती; रुग्णसेवेचे नवे दालन खुले.
अहिल्यानगर दि ०४ :- रवी वाकडे
अहिल्यानगर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थिती; रुग्णसेवेचे नवे दालन खुले.गोरगरीब आणि गरजू रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथे भव्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आज, ४ जुलै रोजी शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब यांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जाळे विस्तारत आहे. याच साखळीचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्हा समन्वयक दिनेश लोंढे यांनी या संपर्क कार्यालयाची सुरुवात केली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या वैद्यकीय अडचणी, शासकीय योजनांचे लाभ आणि रुग्णालयाशी संबंधित समस्या तातडीने सोडवल्या जाणार आहेत.
यावेळी खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब म्हणाले की वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण सर्वजण अविरत रुग्णसेवा करत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे. मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम रुग्णांच्या मदतीसाठी दिवस-रात्र धावून जात आहे. आज सुरू झालेल्या या संपर्क कार्यालयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवा मिळवणे अधिक सोपे होईल."
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात या कार्यालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment