अंधार वाडी येथे रोटर खाली सापडून एकाचा मृत्यू.


अंधार वाडी येथे रोटर खाली सापडून एकाचा मृत्यू.
कराड दि 02 :- रवी वाकडे
अंधार वाडी येथे रोटर खाली सापडून एकाचा मृत्यू. राजेंद्र भागवत बाबर (वय 48, रा. अंधारवाडी, ता. कराड, जि. सातारा) यांचा दि. 30/06/2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मौजे अंधारवाडी गावच्या हद्दीत वागजाई मंदिरामागे रोटरखाली सापडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उंब्रज पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीस मयत अवस्थेत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंब्रज येथे आणण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत एम.एल.सी. 146/2026 दि. 30/06/2026 अन्वये प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर उंब्रज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उंब्रज पोलिसांकडून केला जात आहे.

Comments