कराड उत्तरमधील शेत पानंद रस्त्यांसाठी 7.50 कोटींचा निधी मंजूर. आमदार मनोजदादा घोरपडे .
कराड दि 05 :- रवी वाकडे
कराड उत्तरमधील शेत पानंद रस्त्यांसाठी 7.50 कोटींचा निधी मंजूर. आमदार मनोजदादा घोरपडे .कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतमाल मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेल्या शेत पानंद रस्त्यांच्या कामांसाठी 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
*आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश*
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी याबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे.
*८० टक्के शेती, पण रस्त्यांअभावी अडचणी*
कराड उत्तर हा संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ असून येथे जवळपास ८० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ते व दळणवळणाची सोय नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. अनेकदा शेतबांधावरून वादावादीचे प्रकार घडून ग्रामस्थांमध्ये दुरावा निर्माण होत असे.
*चिखलातून सुटका होणार*
अलीकडच्या काळात प्रत्येक गावातील लोकवस्ती वाढली आहे. अनेक कुटुंबांनी शेतातच घरे बांधून राहण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात त्यांना चिखलातून वाट काढावी लागत होती. नव्याने मंजूर झालेल्या निधीतून पानंद रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास शेतकऱ्यांसह शेतात राहणाऱ्या कुटुंबांचीही चिखलातून सुटका होणार आहे.
या निर्णयामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आ.घोरपडे यांनी व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment